काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा

Senior Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar are contending for the post of Chief Minister काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Senior Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar are contending for the post of Chief Minister

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची घोषणा उद्या होण्याची शक्यता

आमदारांशी बोलून निरीक्षक परतले; खरगेंना अहवाल देणार

मुख्यमंत्रीपदासाठी 2 नव्हे, 4 दावेदारSenior Congress leaders Siddaramaiah and DK Shivakumar are contending for the post of Chief Minister
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी के शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

कर्नाटकात नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना आता वेग आला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्दरामय्या आणि डी के शिवकुमार या दोघांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. १० मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं २२४ पैकी १३५ जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे आणि आत्ता सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू आहे.

कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे अधिकार राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आले आहेत. बंगळुरू इथं काल उशिरा झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. तसा ठरावही संंमत करण्यात आला.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र सिंग आणि काँग्रेस नेता दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.त्यानंतर काल एका हॉटेलमध्ये विधानसभा सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी हॉटेलबाहेर या दोन्ही इच्छुकांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.

त्यांनी घोषणाबाजी करत आपापला नेता पुढचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी मागणी लावून धरली. दरम्यान काल उप निवडणूक आयुक्त अजय बडू, कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना आणि राज्य निवडणूक आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांनी कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांची भेट घेतली आणि २२४ नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांची यादी असलेलं परिपत्रक त्यांना सुपूर्द केलं.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, निरीक्षक रात्रीपर्यंत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अहवाल सादर करणार आहेत. इतर लोकांचीही मते घेतली जातील. उद्या ही प्रक्रिया काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेस सरचिटणीस (संघटन) यांच्या मदतीने पुढे नेली जाईल. दरम्यान, सिद्धरामय्याही सोनिया आणि राहुल यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

काँग्रेस नेते बीके हरी प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की, बैठकीत मत जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही करण्यात आले. डीके शिवकुमार यांनी सोमवारी शांग्री-ला येथे आमदारांची भेट घेतली. यानंतर मीडियाने त्यांना दिल्लीला जाण्याबाबत प्रश्न विचारला. डीके यांनी उत्तर दिले- दिल्लीला जाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय हायकमांडवर सोडला आहे. माझ्यावर सोपवलेले काम मी पूर्ण केले आहे.

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी म्हणाले- AICC अध्यक्ष आणि सरचिटणीस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मत घेऊन मुख्यमंत्र्यांची निवड करतील. प्रत्येक पक्षाला कोणाच्या ना कोणाच्या महत्त्वाकांक्षा आहेत, पण मुख्यमंत्री एकच असेल. आमदार आणि हायकमांडची निवडणूक होणार आहे. केवळ शिवकुमार आणि सिद्धरामय्याच नाही तर एमबी पाटील आणि जी परमेश्वरा यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *