Jayant Patil has been summoned by the Enforcement Directorate for the second time
जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाचं दुसऱ्यांदा समन्स
‘आयएल अँड एफएस’ कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. येत्या २२ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये केली आहे.
आयएल आणि एफएस प्रकरणी हे समन्स बजावलं असल्याचं व-त्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती, अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य करत ईडीनं त्यांना एक आठवड्यानंतरची तारीख दिली आहे.
जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणात आरोपी असलेल्या काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीनं केला आहे. याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला जाईल. मात्र या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया काल माध्यमांना दिली होती.
आता २२ मे रोजी होणाऱ्या चौकशीत काय निष्पन्न होणार आणि जयंत पाटील यांच्याविरोधात ईडी काही कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com