यंदा केरळात मान्सून 4 जूनला दाखल होण्याची शक्यता

Indian Meteorological Department भारतीय हवामानशास्त्र विभाग हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

This year monsoon is likely to arrive in Kerala on June 4

यंदा केरळात मान्सून 4 जूनला दाखल होण्याची शक्यताIndian Meteorological Department भारतीय हवामानशास्त्र विभाग हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : हवामान विभागाने गेल्या महिन्यात सांगितले की, या वर्षी दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 96% (+/-5% एरर मार्जिनसह) पावसासह “सामान्य” मान्सून अपेक्षित आहे.

नैऋत्य मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापासून तीन दिवसांनी उशीर होऊन 4 जून रोजी +/-4  दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी आपल्या अंदाजात म्हटले आहे. जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम जो शरद ऋतूतील कापणीसाठी आणि अन्नधान्याच्या किमती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो.

असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंताजनक वार्ता आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. एरवी केरळमध्ये १ जूनला येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी येण्याची शक्यता आहे.

भारतातील मान्सूनची नांदी केरळातील मान्सूनने होते, यावर्षी केरळात मान्सून थोड्या विलंबाने म्हणजे 4 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्यावर्षी 27  मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. केरळमध्ये मान्सूनचं आगमन उशिरा झालं तरी पुढचा प्रवास उशिरा होईलचं हे आताच सांगता येणार नसल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकणात काही ठिकाणी तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहिल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात सर्वाधिक तापमान काल नागपूर इथं 43.2  अंश सेल्सियस नोंदवलं गेलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *