चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार

Minister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

A system will be prepared for the screening of Marathi films in theatres

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार

– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारMinister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषांतील अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच चित्रपटगृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचे समन्वय आवश्यक असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली करण्यात येईल.

आज झालेल्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत जेणेकरुन या विषयाबाबत विस्तृत बैठक 15 जूननंतर घेण्यात येईल असे यावेळी सांगितले. आज अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबतही काही नियमावली तयार करता येईल का याबाबतचा अभ्यासही करण्यात यावा अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *