Opportunity to be Volleyball Coach for Khelo India Volleyball Training Centre
खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षक होण्याची संधी
खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : जिल्हास्तरीय खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी २९ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
व्हॉलीबॉल प्रशिक्षक पदासाठी उमेदवार ४५ वर्ष वयोगटाआतील असावा. अतिउच्च कामगिरी/ गुणवत्ता असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्ष पर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येईल. ऑलिम्पिक, आशियायी स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग किंवा पदकप्राप्त आणि प्रशिक्षणाचा अनुभवआवश्यक आहे.
जागतिक करंडक स्पर्धा, एशियन चॅम्पियनशीप, साऊथ एशियन स्पर्धा संबंधित खेळाच्या आंतरराष्ट्रीय अधिकृत स्पर्धा सहभाग किंवा पदकप्राप्त आणि प्रशिक्षणाचा अनुभव असावा. राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी -प्रशिक्षणाचा अनुभव असावा. एन.आय.एस.पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत पातळीचे अभ्यासक्रम किंवा बी.पी.एड. एम.पी.एड.सह राष्ट्रीय स्पर्धा पदकप्राप्त आणि प्रशिक्षणाचा अनुभव आवश्यक आहे. राज्यस्तर खेळाडू बीपीएड- एम.पी.एड.सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्पर्धेतील पदकप्राप्त आणि कमीत कमी ५ वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सर्व्हे क्र. १९१, ग्यानबा मोझे हायस्कुल समोर, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे ४११००६ येथे सादर करायचे असून अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी ए.जी. सोलणकर (९८२२३५६१९७) व क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (९५५२९३१११९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com