कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camps in the state from May 6 राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Striving to create a skilled, employment-rich Maharashtra

कुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी व्यवसाय समुपदेशन शिबिर मोलाची भूमिका बजावेल

नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावलं ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्याची गरज

मुंबई : अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camps in the state from May 6 राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावलं ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे

मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेल्या फरकामुळेच कौशल्य विकासाची आवश्यकता अधिक असून त्यासोबतच नवनिर्मिती करणं आणि भविष्यासाठी तयार असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकार उत्तम काम करत आहे, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या कार्यक्रमात सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी कार्यपद्धतीमुळे कौशल्य विकास योजने अंतर्गत शासन कौशल्यविकासाला आणि स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देत आहे असंही ते म्हणाले.

युवा पिढीने कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदार संघात आयोजित केले आहे. या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून युवक, युवतींना नक्की फायदा होईल. या शिबीराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे.

औद्योगिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन शिक्षण घ्या खासदार जे. पी. नड्डा

खासदार जे. पी. नड्डा म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या. तांत्रिक प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अपग्रेड व्हावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. प्रधानमंत्र्यांनी २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. देशात स्कील डेव्हलपमेंटची गरज होती हे लक्षात घेवून प्रधानमंत्र्यांनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली .

राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार – कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, असा प्रश्न असतो तसेच कोणत्या क्षेत्रात आपल्याला कौशल्य प्राप्त करावे लागेल याबाबत साशंकता असते. विद्यार्थ्यांचा संवाद वाढून त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले रोजगार मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्यभरात २८८ मतदारसंघात असे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मेळावे यशस्वीपणे पार पाडले जात आहेत, असेही ते म्हणाले.

मान्यवरांनी केले व्यवसाय समुपदेशन

प्रेरणादायी मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शक डॉ. दिनेश गुप्ता, रोजगाराच्या विविध संधी या विषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक सुरेश वांदिले, करिअर कसे निवडावे या विषयी श्रीमती प्रिया सावंत, व्यक्तीमत्व विकास या विषयी सुचिता सुर्वे तसेच स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन श्री. रोकडे यांनी केले. यावेळी विविध ३८ विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर स्टॉल लावले होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *