संसदेच्या नवीन इमारतीचं येत्या 28 तारखेला लोकार्पण

The new Parliament building will be inaugurated by the Prime Minister on 28th येत्या 28 तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार संसदेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The new Parliament building will be inaugurated by the Prime Minister on 28th

संसदेच्या नवीन इमारतीचं येत्या 28 तारखेला लोकार्पण

येत्या 28 तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार संसदेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण

  • नव्या संसद भवनात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
  • मार्शलना नवा ड्रेस कोड
  • संसद सदस्यांसाठी लाऊंज, पुस्तकालय, भोजन क्षेत्र आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था
  • नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 आणि राज्यसभेच्या 384 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था
  • नवीन संसद भवनाला 3 मुख्य दरवाजे ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वारThe new Parliament building will be inaugurated by the Prime Minister on 28th
येत्या 28 तारखेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार संसदेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : नव्यानं बांधलेल्या संसद भवनाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण दिलं. आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांनी 10 डिसेंबर 2020 रोजी केली होती.

सध्याचं संसद भवन 1927 मध्ये बांधलेलं आहे; त्याला आता जवळपास 100 वर्ष पूर्ण होतील. या संसदेतील जागेची आणि सुविधांची कमतरता लक्षात घेऊन; नवीन संसद भवन उभारण्यात यावं असा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेनं मंजूर केला होता. त्यानुसार नवीन इमारतीत भविष्याचा विचार करून अतिरिक्त आसन क्षमता आणि आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

परिणामी, 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. नव्याने बांधलेली संसद भवन विक्रमी वेळेत दर्जेदार बांधकामाने बांधली गेली आहे.

नव्या संसद भवनात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. यात मार्शलना नवा ड्रेस कोड असणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवन इमारतीच्या बांधकामाची पाहाणी केली होती. बांधकाम करणाऱ्या मजुरांशीही पंतप्रधान यांनी बताचित केली होती.

जुन्या संसद भवनात लोकसभेचे 550 आणि राज्यसभेचे 250 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. तर भविष्यातील परिस्थिती पाहात नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 आणि राज्यसभेच्या 384 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संसद सदस्यांसाठी लाऊंज, पुस्तकालय, भोजन क्षेत्र आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था करुन देण्यात आली आहे.

नव्या संसद भवन इमारतीच्या बांधकामांच कंत्राट टाटा प्रोजेक्टला सप्टेंबर 2020 मध्ये देण्यात आलं होतं. या इमारतीच्या बांधकामासाठी 861 कोटींचा खर्च नियोजीत करण्यात आला होता. काही अतिरिक्त कामांमुळे या इमारतीच्या बांधकामासाठी एकूण 1200 करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सध्याच्या संसदेच्या इमारतीच्या बाजुलाच ही नवी इमारत बांधण्यात येत आहे. एचसीपी डिझाईन्स, अहमदाबाद कंपनीचे वास्तूविशारद बिमल पटेल यांच्या देखरेखीखाली या इमारतीचे बांधकाम केलं जात असून इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून केले जात आहे.

ही नवीन संसद भवन चार मजली असून जर आपण त्याची महत्वाची ही वैशिष्ट्य आहेत की हांते 970 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे.

64 हजार 500 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या नवीन संसद भवनाला 3 मुख्य दरवाजे आहेत. त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आली आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे लोकप्रतिनिधींना त्यांची कामं अधिक चांगल्या पद्धतीने करता येतील.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *