ग्रीन टेक्नॉलॉजी द्वारे 100 तासांत 100 किलोमीटर काँक्रीटीकरण!!

100 Km concreting of Ghaziabad – Aligarh Expressway by Green Technology in 100 hours!! गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गावर ग्रीन टेक्नॉलॉजी द्वारे 100 तासांत 100 किलोमीटर काँक्रीटीकरण!! हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

100 Km concreting of Ghaziabad – Aligarh Expressway by Green Technology in 100 hours!!

गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गावर ग्रीन टेक्नॉलॉजी द्वारे 100 तासांत 100 किलोमीटर काँक्रीटीकरण!!

गाझियाबाद-अलिगड द्रुतगती मार्गाने १०० तासांत बिटुमिनस काँक्रीट यशस्वीपणे टाकून नवा टप्पा गाठला100 Km concreting of Ghaziabad – Aligarh Expressway by Green Technology in 100 hours!!
गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गावर ग्रीन टेक्नॉलॉजी द्वारे 100 तासांत 100 किलोमीटर काँक्रीटीकरण!!
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : गाझियाबाद-अलिगड द्रुतगती मार्गाने १०० तासांत १०० लेन किलोमीटरवर बिटुमिनस काँक्रीट यशस्वीपणे टाकून एक नवीन टप्पा गाठला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गाने एक अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून इतिहास रचला आहे. 100 तासांच्या अभूतपूर्व वेळेत 100 किलोमीटर अंतरावर बिटुमिनस काँक्रीटीकरण केले आहे.

आज या उत्सव समारंभाला संबोधित करताना, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल टीमचे अभिनंदन केले आणि त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले.

क्यूब हायवेज, एल अँड टी आणि गाझियाबाद – अलिगड एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेड (जीएईपीएल) या सर्व कंपन्यांचे त्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी अभिनंदन करतो, असे ट्विट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे

NH34 चा गाझियाबाद – अलिगढ द्रुतगती मार्ग 118 किलोमीटरचा आहे. तो गाझियाबाद आणि अलिगड या दाट लोकवस्तीच्या प्रदेशांमधील वाहतूक दुवा म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. दादरी, गौतम बुद्ध नगर, सिकंदराबाद, बुलंदशहर आणि खुर्जासह दाट लोकवस्ती असलेल्या प्रदेशांना जोडण्यासाठी NH34 च्या गाझियाबाद-अलिगड विभागाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर श्री गडकरींनी भर दिला.

हा प्रकल्प, 118 किलोमीटरचा, एक महत्त्वपूर्ण व्यापार मार्ग म्हणून काम करतो, वस्तूंची वाहतूक सुलभ करतो आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला हातभार लावतो. ते म्हणाले की कोल्ड सेंट्रल प्लांट रीसायकलिंग तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये 90 टक्के मिल्ड मटेरियलचा समावेश होतो आणि ते टिकाऊपणा आणि किफायतशीरतेसाठी स्पष्ट समर्पण दर्शवते. या दृष्टिकोनामुळे इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करत असताना प्रत्येक प्रवाशाला गतिशीलता देणे त्याद्वारे वाणिज्य आणि आर्थिक गतिविधिला चालना देण्यासाठी, गुणवत्तेशी तडजोड न करता जलद गतीने जागतिक दर्जाचे महामार्ग विकसित करून या प्रदेशात आर्थिक विकास साधणे यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *