Constituent parties of the Mahavikas Aghadi will find a way through harmony regarding the distribution of seats in the Lok Sabha elections – Sharad Pawar
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सामंजस्याने मार्ग निघेल – शरद पवार
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत सामंजस्याने मार्ग काढण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.
ते शुक्रवारी (ता.१९) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागांवर दावा केला आहे. त्यासंदर्भात बोलताना, ही त्यांच्या पक्षाची भूमिका असू शकते, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाअधिवेशन सभेच्या उद्घाटनासाठी पवार पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागांवर दावा केला आहे. याबाबत पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
पवार पुढे म्हणाले, “कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे या देशाला आता राजकीय सत्ताबदल हवा आहे, असे दिसू लागले आहे. म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्षांनी एकञ यावे आणि लोकांना पर्याय द्यावा, असा विचार करत आहोत. त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही हीच इच्छा व्यक्त केली आहे. लवकरच आम्ही सर्व एकञ भेटणार आहोत.”
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com