संसद भवनाच्या नवीन वास्तूत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सेंगोल प्रतिष्ठापना

Installation of sengol or scepter by the Prime Minister at the new building of the Parliament House संसद भवनाच्या नवीन वास्तूत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सेंगोल अर्थात राजदंडाची प्रतिष्ठापना हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Installation of sengol or scepter by the Prime Minister at the new building of the Parliament House

संसद भवनाच्या नवीन वास्तूत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सेंगोल अर्थात राजदंडाची प्रतिष्ठापना

महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते

नव्या संसदेत, लोकसभा सभागृहात ८८८ आसनांची व्यवस्था असून तिची संकल्पना राष्ट्रीय पक्षी मोर यावर आधारित
राज्यसभेची क्षमता ३८४ आसनांची व्यवस्था असून तिची संकल्पना कमळ या राष्ट्रीय पुष्पावर आधारितInstallation of sengol or scepter by the Prime Minister at the new building of the Parliament House संसद भवनाच्या नवीन वास्तूत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सेंगोल अर्थात राजदंडाची प्रतिष्ठापना हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवनाच्या नव्या वस्तूत सेंगोल अर्थात राजदंडाची स्थापना केली. नव्या संसद भवनाचं लोकार्पण आज होत असून काल संध्याकाळी पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी अधिनामांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी अधिनामांनी मोदींना सेंगोल अर्थात राजदंड सुपूर्द केला होता.

पवित्र सेंगोलच्या स्थापनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की महान चोल साम्राज्याच्या काळात सेवा, कर्तव्याचा मार्ग आणि देश यांचे प्रतिक म्हणून सेंगोलकडे पाहिले जात होते. राजाजी आणि आधिनम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सेंगोल सत्तेच्या हस्तांतराचे प्रतीक बनला. नवीन संसद भवनाच्या उदघाटनप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी उपस्थित असलेल्या आधिनम संतांना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अभिवादन केले. “या पवित्र राजदंडाचा सन्मान आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो हे आपले भाग्यच आहे. संसद भवनातील कार्यादरम्यान हा राजदंड आपल्याला प्रेरित करत राहील,” ते म्हणाले.

भवनाच्या प्रांगणात आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थानेबरोबरच, या वास्तूच्या निर्मितीसाठी ज्या श्रमिकांनी योगदान दिलं त्यांचाही सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. नवीन संसद भवन १३५ कोटी भारतीयांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणारं असून ही वास्तू ६५ हजार चौरस मीटर क्षेत्रात बांधण्यात आलेली आहे. तिचा आकार त्रिकोणी आहे.

भारतीय लोकशाही व्यवस्थेची ताकद असणाऱ्या या नव्या संसदेत, लोकसभा सभागृहात ८८८ आसनांची व्यवस्था असून तिची संकल्पना राष्ट्रीय पक्षी मोर यावर आधारित आहे. तर राज्यसभेची क्षमता ३८४ आसनांची व्यवस्था असून तिची संकल्पना कमळ या राष्ट्रीय पुष्पावर आधारित आहे. लोकसभेच्या सभागृहात संयुक्त सत्रासाठी १२७२ आसनांची व्यवस्था असून या इमारतीमध्ये सुरक्षित, कार्यक्षम, नवीनतम दळण वळण तंत्रज्ञानासह सुसज्ज अशी कार्यालये आहेत. तसंच अत्याधुनिक दृकश्राव्य प्रणाली आहेत.

नवीन संसद भवन हे पर्यावरण शाश्वततेसाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक असून मध्यवर्ती खुल्या प्रांगणासाठी पूरक अशी रचना असणारी, ही उच्च प्रतीची पर्यावरण पूरक हरित इमारत आहे. भारतीय वारशाचे मूर्त स्वरूप, ते आधुनिक भारताचे चैतन्य आणि विविधता प्रतिबिंबित करणाऱ्या सांस्कृतिक आणि प्रादेशिक कला आणि हस्तकला यांचा समावेश इमारतीत आहे. तर अत्याधुनिक संविधान सभागृह प्रतीकात्मक आणि भौतिकदृष्ट्या नागरिकांना लोकशाहीच्या केंद्रस्थानी ठेवणारे आहे.

नवीन संसद भवन दिव्यांग, दिव्यांगजनांसाठी प्रवेशयोग्य असून स्थापत्यशास्त्राचा चमत्कार, राष्ट्राच्या प्रगतीचे अभिमानास्पद प्रतीक आहे. भव्य रचना केवळ प्रगतीच नव्हे तर राष्ट्राच्या उत्क्रांत भावनेचेही प्रतिनिधित्व करणारी आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *