कोंढवे धावडे येथे ३० मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

Get certificates, certificates, benefits of various schemes through Mahashibir at less efforts  दाखले, प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ महाशिबिराच्या माध्यमातून मिळवा कमी सायास हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

‘Shasan Aaplya Dari’ activity on 30th May at Kondwe Dhwade

कोंढवे धावडे येथे ३० मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

नागरिकांना शासकीय योजना आणि सेवांचा लाभ एकाच छताखाली

शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलअर दाखला इत्यादी) मतदार नोंदणी, आधार नोंदणी व दुरूस्ती आदी सर्व शासकीय योजना अनो सेवांचा यात समावेशGet certificates, certificates, benefits of various schemes through Mahashibir at less efforts  दाखले, प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ महाशिबिराच्या माध्यमातून मिळवा कमी सायास हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजना आणि सेवांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी हवेली तालुक्यातील कोंढवे धावडे येथील अंजनी लॉन्स मंगल कार्यालयात ३० मे २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत शासन विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत तहसिल कार्यालय, पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषि विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशुवैद्यकीय विभाग आदी सर्व विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ लाभार्थीना देण्यात येणार आहे.

शिधापत्रिका, शासकीय प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलअर दाखला इत्यादी) मतदार नोंदणी, आधार नोंदणी व दुरूस्ती, संजय गांधी योजना, सलोखा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, कुटुंब कल्याण योजना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, कन्या समृद्धी योजना, विवाह नोंदणी, कुपोषित बालकांची तपासणी, जमीन मोजणी, भूमापन, प्रॉपटी कार्ड, कृषी औजारांचे वाटप, बियाणे औषध वाटप, महा डीबीटी नोंदणी, जनवरांची तपासणी शिबीर, किसान क्रेडिट कार्ड, पशुसंवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रमाई घरकुल योजना, सुकन्या समृद्धी योजना, आधार जोडणी आदी सर्व शासकीय योजना अनो सेवांचा यात समावेश आहे.

हवेली तालुक्यातील नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी हवेली व तहसिलदार हवेली यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *