अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी

Tourism Minister Mangal Prabhat Lodha पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Strict action should be taken against unauthorized Bangladeshi hawkers

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी

– महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Tourism Minister Mangal Prabhat Lodha पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुंबई : आरे स्टॉलसमोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमात कुर्ला (पश्च‍िम) एल वॉर्ड येथे आज ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 130 तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम 31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 वाजता सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येणार आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *