सरकारची प्रमुख तेल उत्पादक संघटनांसोबत दुसरी बैठक

Image of edible oil खाद्यतेल हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Government’s second meeting with major oil producer associations

सरकारची प्रमुख तेल उत्पादक संघटनांसोबत दुसरी बैठक

जागतिक किमतीत घसरण होत असताना खाद्य तेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याबाबत चर्चा

नवी दिल्ली : जागतिक खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होत असताना खाद्य तेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी, सरकारनं प्रमुख तेल उत्पादक संघटनांसोबत दुसरी बैठक घेतली. नवी दिल्लीत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.Image of edible oil खाद्यतेल हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. बैठकीदरम्यान, उद्योगांनी माहिती दिली गेल्या दोन महिन्यांत विविध खाद्यतेलाच्या जागतिक किमतीत प्रति टन १५० ते २०० डॉलर्सनं घट झाली असल्याची माहिती खाद्यतेल उत्पादन कंपन्यांनी यावेळी दिली. खाद्यतेलाची किंमत आणखी कमी केली जाईल असं खाद्यतेल उत्पादन कंपन्यांनी बैठकीत सांगितलं.

याआधी विभागाने प्रमुख खाद्य तेल संघटनांसोबत बैठकही बोलावली होती आणि महिनाभरात काही प्रमुख ब्रँड्सच्या रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि रिफाइंड सोयाबीन ऑइलच्या एमआरपीमध्ये प्रति लिटर पाच ते पंधरा रुपयांनी घट झाली आहे. मोहरी तेल आणि इतर खाद्यतेलांच्या बाबतीतही अशीच घट झाल्याचे विभागाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्यामुळे आणि खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे तेलाच्या किमतीत घट झाली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *