टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी लव्हलिना बोर्गोहेनचे पदक निश्चित.

Lovlina Borgohain

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी लव्हलिना बोर्गोहेनचे पदक निश्चित.


ईशान्येकडील क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीची संस्कृती भारतासाठी अत्यंत लाभदायक – जी. किशन रेड्डी

ईशान्य क्षेत्र विकास,  पर्यटन आणि संस्कृती मंत्री जी.किशन रेड्डी म्हणाले की,  ईशान्येकडील राज्यांमध्ये क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठीच्या उपक्रमांसाठी असलेला उत्साह हा सर्वश्रुत आहे. ईशान्य क्षेत्र विकास मंत्री होण्यापूर्वी मी केलेल्या या सुंदर भूमीच्या प्रवासातूनच हे जाणवले आहे.

लव्हलिना बोर्गोहेन
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी लव्हलिना बोर्गोहेनचे पदक निश्चित

आता लव्हलिना बोर्गोहेनने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले असून तिने माजी  विश्वविजेती  असलेल्या खेळाडूचा  पराभव केल्यानंतर,माझे हृदय अभिमामाने भरून गेले.  प्रत्येक आसामी नागरिकांसाठीच केवळ  नव्हे तर माझ्याप्रमाणेच प्रत्येक भारतीयासाठी हा आनंददायी क्षण आहे. गोलाघाट जिल्ह्यातील बारो मुखिया गावातील एका तरुणीला टोक्यो ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर पाहताना मला अत्यंत आनंद होतो.

यापूर्वी  मंत्र्यांनी ट्विट केले होते की, “टोक्यो 2020 मध्ये महिलांच्या वेल्टरवेट गटात  उपांत्य फेरीत प्रवेश केल्याबद्दल मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनचे  अभिनंदन. ऑलिम्पिकसाठी  पात्र होणारी आणि आता टोक्यो 2020 मध्ये भारतासाठी पदक निश्चित करणारी ती आसामची पहिली महिला मुष्टियोद्धा आहे”.

लव्हलिनाची लढाऊ वृत्ती  आणि कधीही-हार न मानण्याची  वृत्ती सर्वश्रुत आहे.लॉकडाऊन दरम्यान आण  बर्‍याच जणांनी गॅस सिलिंडरसह प्रशिक्षण घेत असलेली लव्हलिना पाहिली आहे.

पंतप्रधान नेहमी उल्लेख करतात ती ही नारी शक्ती आहे आणि आपल्याला याचा सोहळा करायला हवा.लव्हलिनाचा प्रवास पुढील आठवड्यात होणाऱ्या  उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *