प्रसून जोशी यांच्याहस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अॅपचे उद्धाटन

Inauguration of CBFC's revamped website and app by Prasoon Joshi प्रसून जोशी यांच्याहस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अॅपचे उद्धाटन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Inauguration of CBFC’s revamped website and app by Prasoon Joshi

प्रसून जोशी यांच्याहस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अॅपचे उद्धाटन

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून आपल्या सुधारित वेबसाईट आणि नव्या मोबाईल ऍपचा प्रारंभInauguration of CBFC's revamped website and app by Prasoon Joshi
प्रसून जोशी यांच्याहस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अॅपचे उद्धाटन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई: माहिती आणि प्रसारणमंत्रालयातंर्गत केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळानं अलिकडेचं cbfcindia.gov.in हे सुधारित संकेतस्थळ आणि नवीन e-cine हे नवीन मोबाईल अॅप चालू झाल्याची घोषणा केली. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्याहस्ते या सुधारीत संकेतस्थळ आणि अॅपचं उद्धाटन करण्यात आलं.

कामकाजात अधिक पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्यासाठी आजची ही घोषणा म्हणजे २०१७ पासूनच्या डिजिटायझेशन प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं जोशी यांनी सांगितलं. ते पुढं म्हणाले की, हे संकेतस्थळ आणि अॅप उपयोग कर्त्यांना मैत्रीपूर्ण, मूल्यवान माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आणि अर्जदार तसंच सीबीएफसीच्या कर्मचाऱ्यांना काम करणं सोपं व्हावं, यासाठी आहे.

या संकेतस्थळामधे चित्रपट प्रमाणपत्र, विविध कायदे- नियम, महत्त्वाच्या अधिसूचना, कोर्टाचे निर्णय तसंच प्रमाणीकृत चित्रपटांची सांख्यिकी माहिती उपलब्ध असून, अर्जदारांना संशोधन सोयसुद्धा उपलब्ध आहे. या वेबसाईटवरून दैनंदिन घडामोडी, कार्यक्रम बघता येतील.

नव्याने विकसित मोबाईल ऍप अर्जाच्या सद्यस्थितीच्या प्रगतीचा आणि स्क्रिनिंगच्या संभाव्य तारखांचा रियल टाईम मागोवा, निमंत्रणाला आणि कारणे दाखवा नोटिस यांना प्रतिसाद देण्याची सुविधा आणि आवश्यक कागदपत्रे (10 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या व्हिडिओसह) अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देते आणि त्यायोगे पूर्णपणे स्वयंचलित आणि कमीतकमी मानवी हस्तक्षेपाला प्रोत्साहन देते.

त्याचप्रकारे सीबीएफसी अधिकारी स्क्रिनिंग समितीची स्थापना आणि बैठकांचे नियोजन करू शकतात, अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात, नोटिशींचे प्रतिसाद पाहू शकतात, प्रादेशिक कार्यालय बदलण्याच्या विनंतीला मान्यता देऊ शकतात.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *