The deadline to apply for admission to Diploma in Handloom and Textile Technology is 20th June
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी २० जूनपर्यत अर्ज करायची मुदत
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी २० जूनपर्यत अर्ज करण्याचे वस्त्रोद्योग आयुक्तांचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता दि.२० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त एम.जे. प्रदिप चंदन यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा आणि वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडून दि. २० जून २०२३ पर्यंत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. २० जून २०२३ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्त प्रदीप चंदन यांनी दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com