अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपर जॉय’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला राहणार

Weather Forecast Image

Due to cyclone ‘Beeper Joy’ formed in the Arabian sea, the sea will remain rough till next Saturday

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपर जॉय’ चक्रीवादळामुळे येत्या शनिवारपर्यंत समुद्र खवळलेला राहणार

येत्या २ दिवसात नैऋत्य मौसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यताWeather Forecast Image

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपर जॉय’ चक्रीवादळामुळे येत्या शनिवारपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, तसंच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावं, असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं केलं आहे. या कालावधीत समुद्र किनारी वेगानं वारे वाहणार असल्यानं नागरिकांनी तसंच पर्यटकांनी किनाऱ्यावर जाणं टाळावं, असं आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केलं आहे.

९ आणि १० जूनला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची, तसंचर ३० ते ४० किलोमीटर प्रती तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. आज रात्री साडे ११ पर्यंत वेंगुर्ला ते वास्को या समुद्र किनारी २ ते ३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत अशी माहिती हैद्राबादच्या संस्थेनं प्रसारित केली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याच आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केलं आहे.

येत्या २ दिवसात नैऋत्य मौसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

येत्या २ दिवसात नैऋत्य मौसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सध्या अरबी समुद्र, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगाळ वातावरणात वाढ झालेली आहे.

अरबी समुद्रात काल रात्री निर्माण झालेल्या बिपॉरजॉय चक्रीवादळानं आता अतिशय तीव्र स्वरुप धारण केलं आहे. गोव्याच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ सुमारे ९०० किलोमीटर अंतरावर असून त्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. पुढच्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहुन हलका किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *