पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

56th anniversary of Balbharati बालभारतीचा ५६ वा वर्धापनदिन संपन्न हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Textbooks are available in four parts for class I to VIII students

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट56th anniversary of Balbharati बालभारतीचा ५६ वा वर्धापनदिन संपन्न हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.

पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील उद्बोधन सत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt या लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाठ्यपुस्तक मंडळाकडून करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *