साधना विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Welcoming the students with flowers in Sadhana Vidyalaya

साधना विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

औक्षण व पुष्पवृष्टी करून सनई-चौघडयांच्या मंगल स्वरात विद्यार्थ्यांचा विद्यालयात प्रवेश

हडपसर: शैक्षणिक वर्ष 2023 -2024 15 जून रोजी सुरू होत आहे. नवीन प्रवेश घेतलेले व जुने विद्यार्थीही उन्हाळी सुट्टीनंतर मोठ्या जोशात व आनंदात शाळेत येत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे शाळांतून मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते.Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थी व इतर सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.सनई-चौघडयांच्या मंगल स्वरात विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश केला. विद्यालयातील शिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी स्वागतगीत सादर केले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या वतीने आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थी आनंदित झाले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा हेमलता वाघमोडे,उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी ,उपमुख्याध्यापिका योजना निकम पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,ग्रंथालय विभागप्रमुख प्रदीप बागल, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर ,धनाजी सावंत, सांस्कृतिक विभागप्रमुख संगिता रूपनवर व सविता पाषाणकर,सर्व
विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका माधूरी राऊत यानी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले.तर आभार कमल मोरमारे यांनी मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *