Establishment of free legal services and mediation clinics at railway stations for the first time in the country
देशात प्रथमच रेल्वे स्टेशनवर मोफत विधी सेवा व मध्यस्थी चिकीत्सालय स्थापन
सर्व गरजू व पिडीत व्यक्ती तसेच अटकेत असणाऱ्या सर्व व्यक्तींना मोफत विधी सल्ला व सेवा पुरविण्यात येणार
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे रेल्वे स्टेशन येथे मोफत विधि सेवा व मध्यस्थी चिकीत्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. देशात प्रथमच या प्रकारचे चिकीत्सालय रेल्वे स्टेशनवर स्थापन करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कामगार विभाग, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कामगारांचा बचाव व पुनर्वसन करण्याकरीता सात दिवसांचे विशेष अभियान रबविण्यात येणार असून आज रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाद्वारे सर्व गरजू व पिडीत व्यक्ती तसेच अटकेत असणाऱ्या सर्व व्यक्तींना मोफत विधी सल्ला व सेवा पुरविण्यात येणार आहे. असे कार्यक्रम वेळोवेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने घेण्यात येतील, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल एस. पाटील यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com