जमाबंदी आयुक्तालय येथे ‘तलाठी भरती कक्ष’ सुरू

Department of Land Records

Talathi Recruitment Room’ started at Jamabandi Commissionerate

जमाबंदी आयुक्तालय येथे ‘तलाठी भरती कक्ष’ सुरू

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांच्या सरळसेवा भरती

राज्यातील एकूण ३६ जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार

पुणे : महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु करण्यात आलेला आहे.Department of Land Records

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण ३६ जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने राज्यातील तलाठी पदभरती राबविण्यासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे. त्याअनुषंगाने कार्यालयाच्यावतीने ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु करण्यात आलेला आहे.

या कक्षामध्ये पद भरती प्रक्रिया राबविण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ आणि २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयामधील तरतूदी व मार्गदर्शक सूचनानुसार नमूद कंपन्यांची व्यवहार्यता तपासून कंपनीची निवड करणे, एजन्सीने निवडलेले परीक्षा केंद्र क्षेत्रीय यंत्रणेमार्फत तपासणे, पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन निवड केलेल्या कंपनीसोबत पदभरती प्रक्रियेसंबंधित सामंजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे आयोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या व शिफारस न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, पदभरतीसंबंधीत उमेदवारांकडून आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यासंबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करुन अडचणींचे निराकरण करणे आदी प्रकारची कामे होणार आहे.

सदर तलाठी भरतीसाठी सामान्य नागरिकांसाठी व प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख आनंद रायते यांनी कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “जमाबंदी आयुक्तालय येथे ‘तलाठी भरती कक्ष’ सुरू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *