मोबाईलवर डिजी यात्रा अॅप वापरकर्त्यांची संख्या दहा लाखांच्या वर

Restrictions on air travel between Ukraine and India lifted from today

The number of Digi Yatra app users on mobile is over one million

मोबाईलवर डिजी यात्रा अॅप वापरकर्त्यांची संख्या दहा लाखांच्या वर

विमानतळावरील प्रवाशांना अडथळाविरहीत आणि त्रासमुक्त अनुभव मिळावा हे या सुविधेचे उद्दिष्ट

उड्डाणाच्या 24 तासांच्या आत प्रणालीमधून डेटा साफ केला जातो

डेटा एन्क्रिप्ट केलेला असल्याने तो इतर कोणताही घटक वापरू शकत नाहीRestrictions on air travel between Ukraine and India lifted from today

नवी दिल्‍ली : मोबाईलवर डिजी यात्रा अॅप्लिकेशन वापरणाऱ्या प्रवाशांची संख्या या आठवड्यात दहा लाखांच्या पुढे गेली आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी या अॅपचं उद्घाटन केले, तेव्हापासून 1.746 दशलक्ष लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

सुरूवातीला डिजी यात्रा अॅप सुविधा नवी दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी या तीन विमानतळांवर डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये विजयवाडा, कोलकाता, हैदराबाद आणि पुण्यात ही सुविधा उपलब्ध झाली.

डिजी यात्रा या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उपक्रमात फेशिअल( चेहरा) बायोमेट्रिक पडताळणी तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीचा वापर केला जातो. विमानतळावरील प्रवाशांना अडथळाविरहीत आणि त्रासमुक्त अनुभव मिळावा हे या सुविधेचे उद्दिष्ट आहे. अनेक ठिकाणी तिकीट आणि ओळखपत्रांच्या प्रत्यक्ष, पडताळणीची गरज दूर करून उपलब्ध पायाभूत सुविधांद्वारे उत्तम डिजिटल तंत्रज्ञान सेवा देणे हाही या सुविधेचा हेतू आहे.

डिजी यात्रा प्रक्रियेत प्रवाशांची वैयक्तिक ओळख माहिती (पीआयआय) एका ठिकाणी साठवून ठेवली जात नाही.प्रवाशांचा सर्व डेटा प्रवाशांच्या स्मार्टफोनच्या वॉलेटमध्ये एन्क्रिप्ट आणि संग्रहित केला जातो. प्रवासी जिथून प्रवास सुरू करणार आहे त्या मूळ विमानतळावर मर्यादित कालावधीसाठी डेटा शेअर केला जातो कारण या ठिकाणी डिजी यात्रा ओळखपत्र प्रमाणित करणे आवश्यक असते. उड्डाणाच्या 24 तासांच्या आत प्रणालीमधून डेटा साफ केला जातो. प्रवास सुरू असताना आणि केवळ मूळ विमानतळावर प्रवाश्यांकडून डेटा थेट सामाईक केला जातो. डेटा एन्क्रिप्ट केलेला असल्याने तो इतर कोणताही घटक वापरू शकत नाही आणि कोणत्याही भागधारकांसह तो सामायिक करता येत नाही.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *