भोर व वेल्हे तालुक्यातील पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत ३० जून रोजी

On June 30, the reservation of Police Patil posts in Bhor and Velhe talukas will be released

भोर व वेल्हे तालुक्यातील पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत ३० जून रोजी

भोर व वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या १३२ गावातील पोलीस पाटील पद भरती

पुणे : भोर उपविभागातील भोर व वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या १३२ गावातील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अभिजीत मंगल कार्यालय, महाड नाका, भोर येथे ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती भोरचे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.

भोर तालुक्यातील ७२ गावातील पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. त्यामध्ये नांद, पसुरे, म्हाकोशी, बारे बु., वाठार हि.मा, चिखलावडे बु., भिलारेवाडी, कुंबळे, पिसावरे, रांजे, कुसगाव, चिखलावडे खुर्द, भाडवली, दुर्गाडी, कुडाली खुर्द, सांगवी हि.मा, नानावळे, वावेघर, अभेपूरी, बोपे, गृहिणी, वेणूपुरी, गुढे, वेळवंड, नऱ्हे, महुडे खुर्द, कारुगण, किवत, वर्वे खुर्द, विरवाडी, भोंगवली, राजीवडी, कुंड, करंदी खुर्द, करंजे, कांबरे खुर्द, कोर्ले, डेहेण, उबार्डे, जयतपाड, देवघर, नांदगाव, निगडे, निगुडघर, निवगण, माझेरी, म्हाळवाडी, वरोडी डायमुख, साळुंगण, हिर्डोशी, कुडली बु., राजघर, शिवनगरी, माळेगाव, सांगवी खुर्द, सोनवडी, कंरदी खे. बा., करंदी बु., माजगाव, सांगवी तर्फे भोर, तळजाईनगर, दिवळे, केतकावणे निम्मे, आंबेघर, वाठार हिंगे, सावरदरे, गुणंद, भांबवडे, शिंद, तळे म्हसवली, कांबरे खेबा या गावांचा समावेश आहे.

वेल्हा तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पदे असलेली ६१ गावे पुढील प्रमाणे. आसनी मंजाई, आसनी दामगुडा, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बु, एकलगाव, ओसाडे, कर्नावडी, कानंद, कांबेगी, कुरवटी, कुर्तवडी, कोळवडी, कोंडगाव, कोंढवली, कोंढावळे खुर्द, खामगाव, खोडद, गुगुळशी, धावर, धिसर, मार्गासनी, घोल, भागिनघर, चांदर, कोलंबी, जाधववाडी, ठाणगाव, दादवडी, दापसरे, दापोडे, धानेप, धिंडली, निवी, पाबे, पाल बु., पांघारी, पिशवी, पिंपरी, बार्शीमाळ, बालवड, वरोती खुर्द, ब्राम्हणघर, भालवडी, माजगाव, माणगाव, मोहरी, रानवडी, लव्ही खुर्द, वडगाव झांजे, वांगणी, कातवडी, वांजळे, वरसगाव, वेल्हे बु, वेल्हे बु घेरा, शिरकोली, सूरवड, हिरपोडी, मालवली, घोडकल व गिवशी गावांची सोडत सोडण्यात येणार आहे.

या सोडतीसाठी संबंधित गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी, इच्छुक अर्जदार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोडतीस गैरहजर राहिल्यास नंतर कोणाची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *