मिरजच्या अपंग बालगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

Department of Persons with Disabilities (Divyangjan) Social Justice and Social Assistance, Govt. of Maharashtra, Pune अपंग व्यक्ती विभाग (दिव्यांगजन) सामाजिक न्याय आणि सामाजिक सहाय्य, सरकार. महाराष्ट्र, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The admission process started in Miraj’s disabled children’s home

मिरजच्या अपंग बालगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

शाळेत मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा

पुणे : अपंग कल्याण आयुक्तालयांतर्गत शासकीय निवासी संस्था, मिरज येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या शाळेत मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा देण्यात येते, असे शासकीय अपंग बालकगृह व व शाळेचे अधीक्षक यांनी कळविले आहे.Department of Persons with Disabilities (Divyangjan) Social Justice and Social Assistance, Govt. of Maharashtra, Pune अपंग व्यक्ती विभाग (दिव्यांगजन) सामाजिक न्याय आणि सामाजिक सहाय्य, सरकार. महाराष्ट्र, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

संस्थेच्या परिसरात इयत्ता पहिले ते चौथी पर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते. इयत्ता ५ वी पासून माध्यमिक शाळेत जाण्या-येण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा देण्यात येते. शाळेमार्फत पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश मोफत देण्यात येतात. तसेच मुलींची काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक नेमले जातात.

वसतीगृहामध्ये मुला-मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था, मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यास पलंग, गादी, बिछाना व इतर साहित्य, आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी आदी सुविधा पुरविल्या जातात. अस्थिव्यंगोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकलही दिल्या जातात.

प्रवेशासाठी विद्यार्थी ६ ते १७ वयोगटातील असावा. प्रवेश अर्जासोबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेला अपंगत्त्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला व ३ फोटो जमा करणे आवश्यक राहील. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी, मिरज-४१६४१० तसेच संपर्क क्रमांक ९३२५५५५९८१, ९५५२२३४५८६ किंवा ९४२२२१६४५९ येथे संपर्क साधावा.


हे ही अवश्य वाचा

राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच


Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “मिरजच्या अपंग बालगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *