अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल

Sharad Pawar NCP President राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद शरद पवार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

NCP filed a disqualification petition against nine NCP MLAs including Ajit Pawar

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली Sharad Pawar NCP President राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद शरद पवार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

कराड : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने काल महाराष्ट्रातील भाजप-सेना सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केले. पक्ष फोडण्याच्या डावपेचांना आपलेच काही लोक बळी पडल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आता यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून काय कारवाई केली जाईल याची माहिती दिली आहे. “महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आज मी ती वाचून, त्याचा अभ्यास करुन य़ोग्य निर्णय घेईन,” अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे याच्याबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

आणखी एका अपडेटमध्ये, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी नव्याने समाविष्ट झालेल्या मंत्र्यांची बैठक होत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी शिफारस केली आहे. विरोधी पक्षनेतेपद यापूर्वी अजित पवार यांच्याकडे होते, त्यांनी काल दुपारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.

काल राजभवनात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आठ नेते, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
साबरमती रिव्हरफ्रंट केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध
Spread the love

One Comment on “अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *