28000 devotees visited the holy cave temple at the beginning of Shri Amarnath Yatra
श्री अमरनाथ यात्रेच्या प्रारंभी 28000 भाविकांनी पवित्र गुहा मंदिरात घेतले दर्शन
काश्मीर : जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 7,900 भाविक श्री अमरनाथ गुहेत बाबा बर्फानी यांच्या चरणी लीन झाले.
मरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यात्रेकरुच्या आरोग्यासाठी दोन तात्पुरती रुग्णालये सुद्धा उभारण्यात आली आहेत.
यात्रेच्या दृष्टीने सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये लष्कर आणि पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस , सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा दलांचे कर्मचारी यांचा समावेश आहे.
काश्मीरमध्ये, 1 जुलै रोजी श्री अमरनाथ यात्रेच्या सुरुवातीपासून 28000 हून अधिक भाविकांनी पवित्र गुहेत दर्शन घेतले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 02 जुलैच्या संध्याकाळपर्यंत 18500 यात्रेकरूंनी दर्शन घेतले, तर आजपर्यंत 10000 हून अधिक यात्रेकरूंनी दर्शन घेतले. त्यांनी सांगितले की 4758 यात्रींची चौथी तुकडी यात्री निवास जम्मू येथून संबंधित बालटाल आणि नुनवान बेस कॅम्पच्या दिशेने निघाली होती. ड्रोनसह हायटेक तंत्रज्ञानाचाही सुरक्षा व्यवस्थेसाठी वापर करण्यात येत आहे.
पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर आणि अमरनाथ गुहेच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर शेकडो नवीन सुरक्षा बंकर बांधण्यात आले आहेत.
दरम्यान, केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरो, जम्मू, काश्मीर आणि लडाख, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मीडिया युनिटचे सांस्कृतिक दल अनेक यात्रा थांब्यांवर कार्यक्रम करत आहेत आणि भाविकांमध्ये आध्यात्मिक भाव वाढवणारी अनेक भक्तिगीते वाजवत आहेत.
62 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा यावेळी शनिवारपासून सुरू झाली आहे. यंदाची अमरनाथ यात्रा आतापर्यंतची सर्वात मोठी यात्रा असल्याचं मानलं जातं आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com