Appeal to become a member of the District Library
जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन
जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत वाचक वाढवा हे अभियान
पुणे : जिल्हा ग्रंथालय कार्यालाच्या ग्रंथालयात नवीन वैयक्तिक सभासद नोंदणी सुरु झाली असून जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आदींनी जिल्हा ग्रंथालयाचे सभासद व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
https://commons.wikimedia.org/
शहरी व ग्रामीण भागातील वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यादृष्टीने जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत वाचक वाढवा हे अभियान राबविण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालयात कथा, कांदबऱ्या, बाल साहित्य व स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांचा वाचनीय साहित्याचा खजिना उपलब्ध आहे. त्यासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालय, ९६६ / ९, सरदार बिल्डींग, गुरुद्वारासमोर, रविवार पेठ, पुणे ४११ ००२ (दूरध्वनी क्र. ०२०-२४४६३६२६) या कार्यालयात भेट देवून वैयक्तिक, संस्था सभासद होऊन विविध वाचनीय साहित्याचा लाभ घ्यावा, असेही जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रे. श्री. गोखले यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com