जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

Job opportunities in industries registered on Mahaswayam webportal महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Organized Maharojgar Mela at Jejuri

जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे आयोजनGet certificates, certificates, benefits of various schemes through Mahashibir at less efforts  दाखले, प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ महाशिबिराच्या माध्यमातून मिळवा कमी सायास हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे आयोजन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने, त्यांच्यासह इतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार संक्षिप्त परिचयासह अर्ज व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी १३ जुलै रोजी सकाळी १० वा. महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
औंध आयटीआय येथे ३३ व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

 

Spread the love

One Comment on “जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *