वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या प्रवासभाड्यात सवलत योजना

Indian Railways. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

A discount scheme on AC chair cars and executive class fares of air-conditioned railway trains has been launched.

वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या प्रवासभाड्यात सवलत

रेल्वे मंत्रालयाने अनुभूती आणि विस्टाडोम कोचसह वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या सर्व वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवासभाड्यात सवलत योजना केली सुरू

ही सवलत मूळ भाड्याच्या 25% पर्यंत देता येईल
लागू असलेले इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जाईल
मागील 30 दिवसात ज्या रेल्वेगाड्यांमध्ये 50% टक्क्यांपेक्षा कमी जागा भरल्या गेल्या आहेत (एकतर आरंभापासून गंतव्यापर्यंत पर्यंत किंवा काही विशिष्ट थांबे /विभागांमध्ये) प्रवास करणारी रेल्वेगाडी या सवलतीकरता विचारात घेतली जाईल
ही सवलत तात्काळ प्रभावाने लागू होणार
आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वे भाड्याचा कोणताही परतावा दिला जाणार नाही
Indian Railways. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.
File Photo

नवी दिल्‍ली : रेल्वे गाड्यांमधील प्रवासी आसन क्षमतेचा पूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने, रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वेला वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी भाड्यात सवलत योजना लागू करण्याचा अधिकार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अटी आणि शर्तीं याप्रमाणे आहेत :

प्रवासी भाडे सवलत योजना यांना लागू करता येईल :

  • ही योजना अनुभूती आणि विस्टाडोम कोचसह वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या सर्व वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीकरता लागू असेल.
  • ही सवलत मूळ भाड्याच्या 25% असेल. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, वस्तू आणि सेवा कर, अशा प्रकारचे लागू असलेले इतर शुल्क , स्वतंत्रपणे आकारले जाईल. सवलत कोणत्याही किंवा सर्व वर्गांमध्ये प्रवासी संख्येच्या व्याप्ततेच्या आधारावर दिली जाऊ शकते.
  • मागील 30 दिवसात ज्या रेल्वेगाड्यांमध्ये 50% टक्क्यांपेक्षा कमी जागा भरल्या गेल्या आहेत (एकतर आरंभापासून गंतव्यापर्यंत पर्यंत किंवा काही विशिष्ट थांबे /विभागांमध्ये) प्रवास करणारी रेल्वेगाडी या सवलतीकरता विचारात घेतली जाईल. सवलतीचे प्रमाण ठरवताना स्पर्धात्मक वाहतुकीचे भाडे हा निकष लक्षात घेतला जाईल.
  • ही सवलत तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. मात्र आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना रेल्वे भाड्याचा कोणताही परतावा दिला जाणार नाही
    अशी सवलत सुरुवातीला ती गाडी ज्या स्थानकातून सुटते त्या स्थानकाच्या विभागीय मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांनी निश्चित केलेल्या काही कालावधीसाठी लागू केली जाईल आणि ती लागू केल्यापासूनच्या प्रवासाच्या तारखांसाठी कमाल सहा महिन्यांच्या अधीन असेल. सवलतीचे भाडे संपूर्ण कालावधीसाठी किंवा काही कालावधीसाठी किंवा महिन्यानुसार किंवा हंगामी किंवा आठवड्यातील दिवसांसाठी/सप्ताहाअंती, वर नमूद केलेल्या कालावधीच्या मागणीनुसार दिले जाऊ शकते.
  • आंतर-विभागीय गाड्यांसाठी, मूळ स्थानक ते गंतव्य स्थानक या दोन्हीला किंवा गंतव्यस्थानाकरता, इतर विभागीय रेल्वेचे पीसीसीएम/व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी सल्लामसलत करून किंवा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन च्या बाबतीत सीओएम / सीसीएम बरोबर सल्लामसलत करून प्रवासी भाड्यात सवलत दिली जाऊ शकते.
  • या योजनेचा आढावा नियमितपणे घेतला जाईल आणि प्रवासी व्याप्ततेवर आधारित, सवलतीत सुधारणा / सवलतीत मुदतवाढ / मागे घेतली जाऊ शकते.
    सवलतीत फेरबदल/सवलत योजना मागे घेण्याचा निर्णय घेतल्यास, त्याची तात्काळ अंमलबजावणी देखील केली जाऊ शकते. मात्र आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून भाड्याचा कोणताही फरक आकारला जाणार नाही किंवा वसूल केला जाणार नाही.
  • ज्या रेल्वेगाड्यामध्ये विशिष्ट श्रेणीला फ्लेक्सी-भाडे योजना लागू आहे आणि त्यातील प्रवासी संख्या कमी आहे, त्यामध्ये प्रवासी संख्या वाढवण्याच्या उद्देशाने आरंभीच्या काळात फ्लेक्सी-भाडे योजना मागे घेतली जाईल. मात्र त्यानंतर देखील प्रवासी संख्येत वाढ झाली नाही तरच त्या ट्रेन्स/वर्गामध्ये सवलत योजना लागू केली जाऊ शकते.
  • विशेषाधिकार तिकिट ऑर्डरवरील तिकिटे/रेल्वे पासेसवरील भाड्यातील फरक/सवलतीचे व्हाउचर/आमदार/माजी आमदार कूपन/वॉरंट/खासदार/माजी खासदार/स्वातंत्र्यसैनिक इत्यादी तिकिटे सवलतीच्या भाड्यावर नव्हे तर मूळ वर्गवार भाड्यावर आरक्षित केली जातील
  • अशा गाड्यांमध्ये सुरुवातीपासून अंतिम स्थानकापर्यंत सवलत दिली असेल तर ठराविक कालावधीसाठी तत्काळ कोटा निश्चित केला जाणार नाही. तसेच जर काही भागाच्या प्रवासासाठी सवलत दिली गेली असेल, तर ज्या प्रवासाकरता सवलत दिली जाते आहे त्या भागासाठी तत्काळ कोटा प्रदान केला जाऊ शकत नाही.
  • ही सवलत पहिला आरक्षण तक्ता तयार होईपर्यंत आणि सध्याच्या बुकिंग दरम्यान आरक्षित केलेल्या तिकिटांसाठी असेल. टी टी ई द्वारे ऑनबोर्ड देखील सवलत दिली जाऊ शकते.
  • ही योजना सुट्टी/सण विशेष म्हणून सुरू केलेल्या विशेष गाड्यांवर लागू होणार नाही

या योजनेची तरतूद 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत लागू असेल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण
Spread the love

One Comment on “वातानुकूलित रेल्वे गाड्यांच्या प्रवासभाड्यात सवलत योजना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *