General Merit Lists, Provisional Selection Lists for Clerk-Typist, Tax Assistant Cadres Released
लिपिक-टंकलेखक, कर सहायक या संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या, तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील लिपिक – टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या दोन्ही संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या व तात्पुरत्या निवड याद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प संवर्गनिहाय स्वतंत्ररित्या मागविण्यात येत आहे.
या परीक्षांच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक दिनांक १३ जुलै, २०२३ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १९ जुलै, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “लिपिक-टंकलेखक, कर सहायक या संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या, तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध”