Ajitdada means a man of work;
अजितदादा म्हणजे कामाचा माणूस; आम्ही जनरल पब्लिक आम्हाला तुमच्या बद्दल आदर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जनतेच्या भावना; वंदे भारत ट्रेनमध्ये अजितदादांचीच क्रेझ
मुंबई : वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांना सांगतात “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा”… आज वंदे भारत ट्रेनमध्ये अशाच अनेकांच्या भावना होत्या.
आज शनिवारी (दि.15 जुलै) नाशिक येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले. नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला. मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा”… अशा शब्दात त्यांनी जणू राज्यातल्या जानेतेचीच प्रतिनिधीक भावना व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा असे सांगत आपल्या सोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना आपल्या सुरक्षा राक्षकांना केल्या. अशा प्रकारे वंदे भारत ट्रेनने अजितदादांची क्रेझ अनुभवली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अजितदादा म्हणजे कामाचा माणूस; आम्ही जनरल पब्लिक आम्हाला तुमच्या बद्दल आदर”