देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या झाली कमी

National Institution for Transforming India हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The number of people living below the poverty line in the country is less

देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या झाली कमी

पाच वर्षांच्या कालावधीत साडेतेरा कोटी भारतीयांची बहुआयामी गरिबीतून मुक्तता

ग्रामीण भागातील गरिबीत 32.59% वरुन 19.28% अशी जलद गतीने घसरण

पोषण, शालेय शिक्षणाचा कालावधी, स्वच्छता तसेच स्वयंपाकाचा गॅस यांमध्ये झालेल्या सुधारणांनी गरिबी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीNational Institution for Transforming India
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्‍ली : देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६ या वर्षी २४ पूर्णांक ८५ शतांश असलेली गरिबांची संख्या २०१९- २० या वर्षात १४ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाली आहे. म्हणजे पाच वर्षांत १३ कोटी ५० लाख लोकांची दारिद्रयातून सुटका झाली.

त्यानंतर नवी दिल्लीत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं निर्धारित उद्दिष्ट भारत वेळेपूर्वी कितीतरी आधी गाठेल असं त्यांनी सांगितलं. याच पाच वर्षांत ग्रामीण भागातली गरिबी ३२ पूर्णांक ५९ शतांश टक्क्यावरून कमी होऊन १९ पूर्णांक २८ शतांश टक्के होईल, असं अहवालात म्हटलं आहे.

स्वच्छता,पोषण,स्वयंपाकाचा गॅस, आर्थिक समावेशकता, पेयजल तसेच वीज पुरवठा यांमध्ये सुधारणा करण्यावर सरकारने समर्पितपणे लक्ष केंद्रित केले असून त्यामुळे या क्षेत्रांत लक्षणीय प्रमाणात सफलता मिळाली आहे.

एमपीआय मधील सर्वच्या सर्व 12 निर्देशाकांमध्ये उल्लेखनीय सुधारणा दिसून आली आहे. पोषण अभियान तसेच अॅनिमियामुक्त भारत यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांनी आरोग्याच्या क्षेत्रातील वंचितता कमी करण्यात योगदान दिले आहे.

स्वच्छ भारत अभियान (एसबीएम) आणि जल जीवन अभियान (जेजेएम) यांसारख्या उपक्रमांनी देशातील स्वच्छतेमध्ये सुधारणा घडवली आहे.पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून (पीएमयुवाय)देण्यात येणाऱ्या अनुदानित दरातील स्वयंपाकाच्या गॅसमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले असून स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई कमी करण्यात 14.6 टक्क्यांची सुधारणा झाली आहे.

सौभाग्य, पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय), पंतप्रधान जन धन योजना (पीएमजेडीवाय) आणि समग्र शिक्षण या उपक्रमांनी देखील देशातील बहुआयामी गरीबीचे प्रमाण कमी करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू
Spread the love

One Comment on “देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या झाली कमी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *