वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

Traffic signal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Varandha Ghat road is completely closed for heavy traffic during rainy season

वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

नारंगी आणि लाल इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला

Traffic signal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image by Wikimedia Commons
https://commons.wikimedia.org/

पुणे : पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत २२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केली आहे.

या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नारंगी आणि लाल इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद राहील. नारंगी आणि लाल इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
राज्यात २० ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन करणार मतदारांची पडताळणी
Spread the love

2 Comments on “वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *