इर्साळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटलेतल्या मृतांची संख्या १६ वर

The death toll in the landslide accident at Irsalwadi in Raigad district has risen to 16 रायगड जिल्ह्यात इर्साळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटलेतल्या मृतांची संख्या १६ वर हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The death toll in the landslide accident at Irsalwadi in Raigad district has risen to 16

इर्साळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटलेतल्या मृतांची संख्या १६ वर

इर्साळवाडी दुर्घटना; हवाई मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर तैनात; मदत व बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

इर्साळवाडी : रायगड जिल्ह्यात इर्साळवाडी इथं झालेल्या दरड दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. अजूनही १०० च्या आसपास लोक बेपत्ता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.The death toll in the landslide accident at Irsalwadi in Raigad district has risen to 16
रायगड जिल्ह्यात इर्साळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटलेतल्या मृतांची संख्या १६ वर
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

९८ लोकांना वाचवण्यात बचाव यंत्रणेला यश आलं आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, आणि अंधार पडू लागल्यानं संध्याकाळी बचावकार्य थांबवावं लागलं. उद्या सकाळी लवकर पुन्हा हे काम सुरु केलं जाणार आहे. सरकारनं मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे.

मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला डोंगरावर असलेल्या इर्शाळवाडीतल्या १७ घरांवर ही दरड कोसळली, तर अन्य २० घरं पूर्णपणे उध्वस्त झाली. इर्साळवाडीत मदत कार्य करताना बेलापूर अग्निशमन केंद्राचे सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा मृत्यू झाला. इर्साळवाडीत मदत आणि बचाव कार्यासाठी यंत्रणा आणि मनुष्यबळ पोहोचल्यानं नागरिकांनी याठिकाणी गर्दी करु नये, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

सकाळपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचाव कार्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर विधानपरिषदेत निवेदन दिलं.

दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवण्याला राज्य शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. या दुर्घटनेतल्या विस्थापितांना अन्न-धान्य आणि इतर मदत दिली जाणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय हवामान विभागानं राज्यातल्या काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत तथापि, खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत आहेत. राज्य शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर सरकारच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत तथापि, खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत आहेत. राज्य शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर सरकारच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रायगड जिल्ह्यातल्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रायगड जिल्ह्यातल्या मौजे चौक-मानिवली (ता. खालापूर) या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना दि. १९ जुलै २०२३ रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत इरशाळवाडी या गावातली घरे मातीच्या ढिगाऱ्या खाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे आणि दुर्घटना घडलेले ठिकाण दुर्गम भागात असल्यानं त्याठिकाणी संपर्क साधताना देखिल अडथळे येत होते.

प्रत्यक्ष घटनास्थळी मंत्री गिरीष महाजन यांच्यासह स्थानिक आमदार महेश बांदे उपस्थित आहेत. तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद
Spread the love

One Comment on “इर्साळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटलेतल्या मृतांची संख्या १६ वर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *