Foundation laying of 108 feet tall statue of Lord Sri Rama in Kurnool
कुर्नूल येथील भगवान श्री रामाच्या 108 फूट उंच पुतळ्याची पायाभरणी
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील भगवान श्री रामाच्या 108 फूट उंच पुतळ्याची केली पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी करून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला
लवकरच श्री राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून शेकडो वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीराम त्यांच्याच स्थानी विराजमान होणार
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील भगवान श्री रामाच्या 108 फूट उंच पुतळ्याची पायाभरणी केली.
आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, आज कुर्नूलमधील मंत्रालयम येथे 500 कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या भगवान श्री रामाच्या भव्य पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, मंत्रालयम येथे स्थापित करण्यात येणारी प्रभू श्रीरामाची 108 फूट उंचीची ही मूर्ती आपल्या सनातन धर्माचा संदेश संपूर्ण जगाला येणाऱ्या अनेक युगांपर्यंत देत राहील तसेच देशात आणि संपूर्ण जगात वैष्णव परंपरा अधिक दृढ करेल. गृहमंत्री शाह म्हणाले की, 108 ही संख्या हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र संख्या मानली जाते.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, हा प्रकल्प तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेल्या मंत्रालयम गावातील 10 एकर क्षेत्रात पसरलेला आहे आणि तो आगामी अडीच वर्षात पूर्ण होईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री राम मंदिराची पायाभरणी करून अयोध्येत श्री राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला आहे. आता लवकरच श्री राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून शेकडो वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीराम त्यांच्याच स्थानी विराजमान होणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
2 Comments on “कुर्नूल येथील भगवान श्री रामाच्या 108 फूट उंच पुतळ्याची पायाभरणी”