लवचिकता हे कोणत्याही यशस्वी शिक्षण प्रणालीचे वैशिष्ट्य

Education-Pixabay

Flexibility is a hallmark of any successful education system

लवचिकता हे कोणत्याही यशस्वी शिक्षण प्रणालीचे वैशिष्ट्य

लवचिकता हे कोणत्याही यशस्वी शिक्षण प्रणालीचे वैशिष्ट्य आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 चा तो एक अविभाज्य घटक आहे: प्रा. एस. सुदर्शन, आयआयटी, बॉम्बे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020, हा भारतीय ज्ञानाच्या आधारे पुढे जाण्याचा मार्ग दाखवणारा एक महत्त्वाकांक्षी दस्तऐवज आहे: उपायुक्त, केंद्रीय विद्यालय संघटना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020, विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासाठी आणि उत्तम कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता बहु-अनुशासनात्मक दृष्टिकोनास प्रोत्साहन देते: सहसंचालक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयNational Education Policy 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : “लवचिकता हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 चा अविभाज्य घटक आहे. लवचिकता हे कोणत्याही यशस्वी शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे आणि ते एक उत्तम व्यक्तीमत्वास घडवते” असे आयआयटी बॉम्बेचे उपसंचालक प्रा. एस. सुदर्शन म्हणाले. ते मुंबईत प्रेस क्लब येथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त’ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रा. अविनाश महाजन, अधिष्ठाता (शैक्षणिक कार्यक्रम), आयआयटी, प्रा. एस. सुदर्शन, उपसंचालक, आयआयटी, सोना सेठ, उपायुक्त, केंद्रीय विद्यालय संघटना, मुंबई प्रदेश आणि केतन पटेल सहसंचालक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय हे देखील यावेळी उपस्थित होते.

एनईपीने उच्च शिक्षणात निर्माण केलेला लवचिकतेचा मार्ग प्रा एस. सुदर्शन यांनी विशद केला. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील मुख्य अभ्यासक्रमांच्या संख्येशी तुलना करत, मुख्य अभ्यासक्रम आणि अनेक निवडक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कसे लवचिकता देतात हे त्यांनी सांगितले. “त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. लवचिकते व्यतिरिक्त, एनईपीने पारंपरिक मार्गांच्या पलीकडे जाऊन नवीन विषयांना आयआयटी मध्ये प्रोत्साहन दिले आहे. व्यवस्थापन आणि उद्योजकते संबंधित स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल फॉर आंत्रप्रेन्योरशिप आणि इतर” यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

एनईपी 2020 च्या विविध तरतुदींशी सुसंगत असणाऱ्या आयआयटी बॉम्बे मधील विविध कार्यक्रमांची माहिती प्रा. अविनाश महाजन (शैक्षणिक कार्यक्रम) यांनी दिली. ती खालीलप्रमाणे आहे:

1. मूळ आणि निवडक अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक आधारित प्रणाली.

2. विद्यार्थ्यांना त्यांचा स्वतःचा अभ्यासक्रम निवडण्याची करण्याची परवानगी.

3. श्रेयांक आधारित शिकाऊ उमेदवारी.

4. सेमेस्टर्सची अदलाबदल विद्यार्थ्यांना अधिकाधिक अनुभव प्रदान करते.

5. लवकर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची शक्यता.

6. आंतरराष्ट्रीयीकरण सुलभ करण्यासाठी परदेशी विद्यापीठांसह सक्षम अभ्यासक्रम/कार्यक्रम.

7. कौशल्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शैक्षणिक संपर्क

“एनईपी हा एक मजबूत दस्तऐवज असून अद्ययावत अध्यापनशास्त्राशी सुसंगत आहे, असे केंद्रीय विद्यालय संघटना, मुंबई प्रदेशच्या उपायुक्त, सोना सेठ यांनी यावेळी बोलताना सांगितले. हे एक असे प्रेरणादायी दस्तऐवज आहे जे भारतीय ज्ञानाचा पारंपरिक पाया कायम ठेवून पुढील मार्गक्रमणासाठी दिशा दर्शवत आहे. हे धोरण बालककेंद्रित असल्यामुळे प्रत्येक बालकामधील वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधता येतात. सारासार आणि रचनात्मक विचारांना अधिकाधिक वाव देणारी शालेय शिक्षण प्रणाली तयार करणे हा केंद्रीय विद्यालयांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

एनईपी 2020 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांविषयी सेठ यांनी विस्तृत माहिती दिली. ते खालीलप्रमाणे आहेत.

1. NEP – 2020 च्या शिफारसीनुसार, शैक्षणिक वर्ष 2022 – 23 पासून सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय सहा वर्ष + असे सुधारण्यात आले आहे.

2. निपुण उपक्रमा अंतर्गत ध्येय गाठण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी PIMS शी लिंक केलेल्या वेब ऍप्लिकेशनद्वारे केलेल्या रेकॉर्डिंगद्वारे निरीक्षण केले जात आहे.

3. एनईपी 2020 मध्ये सांगितल्याप्रमाणे बालवाटिकांचा परिचय, सत्र 2022-23 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर कायमस्वरूपी इमारत असलेल्या 49 केंद्रीय विद्यालयांमध्ये आणि बालवाटिकेच्या तीनही वर्गांमध्ये 5,477मुलांना प्रवेश

4. विद्या प्रवेश: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, एन सी ई आर टी ने ‘इयत्ता पहिलीसाठी विद्या प्रवेश’ नावाचे 3 महिन्यांचे बालनाट्यावर आधारित ‘शालेय तयारी मॉड्यूल’ विकसित केले आहे. जे शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून देशभरातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये मध्ये लागू केले जात आहे.

5. मूलभूत स्तरावरील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCFFS) 20 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यान्वित करण्यात आला, हा भारतातील 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठीचा पहिला एकात्मिक अभ्यासक्रम आराखडा असून केंद्रीय विद्यालयांमध्ये तो लागू करण्यात आला आहे.

6. इयत्ता आठवी नंतर व्यावसायिक आणि कौशल्य वृद्धी करणाऱ्या वर्गाचा परिचय.

7. पालकांचा सहभाग वाढवून त्यांना भागधारक बनवणे

8. NISHTHA कार्यक्रमाद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण.

याशिवाय देखील केंद्रीय विद्यालयांमध्ये विद्यांजली, पीएम ई विद्या, अटल नवोन्मेष अभियान आणि इतर विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला जातो.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत १४१६१ खासगी बसची तपासणी
Spread the love

One Comment on “लवचिकता हे कोणत्याही यशस्वी शिक्षण प्रणालीचे वैशिष्ट्य”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *