National Education Policy 2020 useful for student development
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त वरिष्ठ प्राचार्य सुहास लावंडे यांचे प्रतिपादन
तीन वर्षपुर्तीनिमित दिल्ली येथे 29 जुलै रोजी दुसरे अखिल भारतीय शिक्षण परिषदचे आयोजन
सोलापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्था सक्षम होत आहेत. शिक्षणापासून ते कौशल्य विकासापर्यंत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे असे प्रतिपादन केंद्रीय विद्यालय संघठन, मुंबई क्षेत्राचे प्राचार्य सुहास लावंडे यांनी केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तीन वर्षपुर्तीनिमित दिल्ली येथे 29 जुलै दुसरे अखिल भारतीय शिक्षण समागमचे उदघाटन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार आहे. या अनुषंगाने संपूर्ण देशभर पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची उद्दिष्टे, अंमलबजावणी व फलप्राप्ती याबद्दल लोकांना माहिती व्हावे या उद्देशाने केंद्रीय विद्यालय संघठन आणि जवाहर नवोदय विद्यालय समिती यांच्यावतीने आज श्रमिक पत्रकार संघ, सोलपूर येथे पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री लावंडे बोलत होते. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, केंद्रीय विद्यालय संघठन सोलापूरचे प्राचार्य प्रशांत कुलकर्णी, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य लावंडे म्हणाले, पीएमश्री योजनेचा या धोरणात समावेश करण्यात आला आहे यामध्ये संपूर्ण भारतात सुमारे 14500 शाळेमध्ये परिपूर्ण शिक्षण, आय सी टी तंत्रज्ञानाचा उपयोग, कौशल्याधारित शिक्षण पद्धतिच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत निर्माणासाठीच्या शाळा उभारण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अभियायानांतर्गत इयत्ता 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यामध्ये पायाभूत साक्षरता व गणन कौशल्य पूर्णपणे विकसित करण्याचा उद्देशाने निपूण भारत योजना राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत इयत्ता 1ली वर्गात प्रवेश घेताच विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांवर आधारित मनोरंजनात्मक 3 महिन्याचा “विद्या प्रवेश कार्यक्रम” 20222-23 शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.
प्राचार्य कोठाडी म्हणाले, शैक्षणिक धोरणांतर्गत निडर, पीएम ई-विद्या, विद्यांजल, एकात्मिक शिक्षक शिक्षण योजना, पायाभूत वर्गांसाठी राष्ट्रीय आकृती बंध, परख, समग्र प्रगती पत्रक आणि जन जन साक्षर या सर्व उपक्रमांची व योजनांची अंमलबजावणी केंद्रीय विद्यालय संघठन, नवोदय विद्यालय, समिती आणि इतर शासकीय शाळातून सुरु झाली आहे. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम या योजना अंतर्गत शिक्षकांना वेळोवेळी केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालय समिती प्रशिक्षण देणार जेणेकरून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि दिक्षा मंच द्वारे आयोजित शिक्षण कार्यक्रमात के.व्ही.एस., एन.व्ही.एस. आणि इतर सरकारी – खाजगी शाळांचे शिक्षक भाग घेणार जेणेकरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अमलबजावणी व उद्दिष्टपूर्तीसाठी सक्षम व अद्यावत शिक्षक वर्ग निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक एस के मठपती, जी के वाणी, शहरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड संलग्न सुयश गुरुकुलचे श्रीमती बायस, आय एम एस चे अपर्णा कुलकर्णी, ओर्चिड शाळेचे श्रीकांत जोशी, के एल ई चे संजय वऱ्हाडे आणि ग्लोबल विलेज पब्लिक स्कूलचे श्रीमती नदाफ उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त”