खेड तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

Khed Taluka Police Patil Recruitment Process Suspended

खेड तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया स्थगित

पुणे : खेड तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी भरती प्रकियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा घेण्यात येणार होती.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील काही गावांतील पुणे वर्तुळ रस्त्याची संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून रोहकल येथील जमीन संपादनाच्या अनुषंगाने मोजणी स्थगित करण्याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने १ ऑगस्ट रोजीची नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखेपर्यंत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. खेड उपविभागीय कार्यालयाकडून लेखी परीक्षेचा दिनांक, स्थळ व पुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *