‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन

District Soldier Welfare Officer, Pune जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Calling the soldiers, and ex-servicemen of the district to attend the program ‘Saink Ho for Tumchyasathi’

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाला जिल्ह्यातील सैनिक, माजी सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

कार्यक्रमात महसूल कार्यालयाकडून देण्यात येणार विविध दाखले, प्रमाणपत्रे यांचे आजी माजी सैनिकांना वाटप करण्यात येणार

घर, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे, समस्यावर कार्यवाही करण्यात येणार

पुणे : ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या राज्य शासनाच्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कार्यरत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.District Soldier Welfare Officer, Pune जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

या कार्यक्रमात महसूल कार्यालयाकडून देण्यात येणार विविध दाखले, प्रमाणपत्रे यांचे आजी माजी सैनिकांना वाटप करण्यात येणार असून घर, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे, समस्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहिद झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांना व शौर्य पदक धारकांना जमीन वाटपाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील.

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमात आपल्या समस्या निकाली काढण्यासाठी लेखी अर्जासह संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) एस. डी. हंगे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त
Spread the love

One Comment on “‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *