17 people died after a crane collapsed at Ambegaon in Thane district
ठाणे जिल्ह्यात आंबेगाव इथं क्रेन कोसळल्यानं १७ जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत
शहापूर: ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातल्या आंबेगाव इथं काल रात्री अंगावर क्रेन कोसळल्यानं १७ जणांचा मृत्यू झाला, त्यात ५ अभियंते आणि १२ कामगाराचा समावेश आहे. आंबेगावमधे सातगाव पूल इथं समृद्धी महामार्गावर पुलाचं काम सुरु असताना ही क्रेन तिथं काम करणाऱ्यांच्या अंगावर कोसळली.
स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथकही दाखल झालं असून त्यांनी काम सुरु केलं आहे. आणखी पाच ते सहा जण ढीगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतं आहे. त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली.
समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रातील शहापूर, येथे झालेल्या दुःखद अपघाताबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी महाराष्ट्रात शहापूर,येथे झालेल्या भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी उपराष्ट्रपतींनी प्रार्थना केली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात उपराष्ट्रपती म्हणाले;
“महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे.”
महाराष्ट्रातील शहापूर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शहापूर, येथील दु:खद दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयाची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट केले आहे की;
“महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेने मला तीव्र दु:ख झाले आहे. यात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना मी व्यक्त करत आहे. आमच्या संवेदना आणि प्रार्थना जखमींसोबत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि स्थानिक प्रशासन अपघाताच्या ठिकाणी कार्य करत आहेत आणि बाधितांना योग्य ते सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना केल्या जात आहेत.
प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ठाणे जिल्ह्यात आंबेगाव इथं क्रेन कोसळल्यानं १७ जणांचा मृत्यू”