Special Registration Campaign of Skill Development Programme
कौशल्य विकास कार्यक्रमाची विशेष नोंदणी मोहीम
आवश्यक कौशल्यांची गरज एकत्रित करण्याकरीता ‘कौशल्याची मागणी सर्वेक्षण’
उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहीम
पुणे : राज्यात कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता राज्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मोठ्या उद्योगांतील कुशल, अर्धकुशल अकुशल अशा विविध प्रकाराच्या जॉबरोलनिहाय आवश्यक कौशल्यांची गरज एकत्रित करण्याकरीता ‘कौशल्याची मागणी सर्वेक्षण’ व उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहीम १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे.
उमेदवार व उद्योग दोहोंची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षण प्रदान केल्यास, त्याद्वारे उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वारस्यामध्ये वृद्धी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होऊन प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत.
या मोहिमेदरम्यान उमेदवारांनी आपली माहिती सादर करण्याकरिता लिंक https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8
ही तर उद्योजकांसाठीची लिंक https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9 ही आहे,
तरी जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी व उद्योजकांनी १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी कौशल्य विकास प्रशिक्षणासंबंधीची माहिती विहीत लिंकद्वारे सादर करावी.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहनही केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “कौशल्य विकास कार्यक्रमाची विशेष नोंदणी मोहीम”