केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना “सहकार महर्षी” ग्रंथ प्रदान

"Sahakar Maharshi" book presented to Union Cooperation Minister Amit Shah केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना "सहकार महर्षी" ग्रंथ प्रदान हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

“Sahakar Maharshi” book presented to Union Cooperation Minister Amit Shah

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना “सहकार महर्षी” ग्रंथ प्रदान

सहकारातील १५३ महनीय व्यक्तींचा चरित्रकोश “सहकार महर्षी” ग्रंथ"Sahakar Maharshi" book presented to Union Cooperation Minister Amit Shah
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना "सहकार महर्षी" ग्रंथ प्रदान

हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : सहकार भारती निर्मित आणि सहकार सुगंध प्रकाशित “सहकार महर्षी” ग्रंथ पुणे (चिंचवड) येथील केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री ना. अमितभाई शहा, सहकार राज्यमंत्री ना. बी. एल. वर्माजी, राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, ना. अजितदादा पवार, सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संपादक मंडळातील ज्येष्ठ सदस्य डॉ. मुकुंद तापकीर यांनी प्रदान केला.

“सहकार महर्षी” ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन २०२१ मध्ये ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते आळंदी येथे झाले होते. महाराष्ट्राची सहकार चळवळ रुजवणाऱ्या, फुलवणाऱ्या एकूण १५३ सहकारातील महनीय व्यक्तींचा असलेला हा चरित्रकोश तब्बल ९०० पानांचा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी सदर ग्रंथाची शिफारस केलेली आहे. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा प्रथम पुरस्कार देखील या ग्रंथास जाहीर झाला आहे. या ग्रंथाची “दुसरी आवृत्ती” लवकरच प्रकाशित करण्यात येणार आह, असे भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
“मेरी माटी – मेरा देश” हे अभियान लोकसहभागातून राज्यात यशस्वी करावे
Spread the love

One Comment on “केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना “सहकार महर्षी” ग्रंथ प्रदान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *