देशभरात उद्यापासून सर्वत्र ‘मेरी माटी मेरा देश’अभियान

‘Transforming India’s Mobility’

The ‘Meri Mati Mera Desh’ campaign will be launched across the country from tomorrow

देशभरात उद्यापासून सर्वत्र ‘मेरी माटी मेरा देश’अभियान

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवाची सांगता या अभियानाने होणार

नवी दिल्ली : मेरी माटी मेरा देश हे अभियान उद्यापासून म्हणजेच ऑगस्ट क्रांतिदिनापासून देशभरात राबवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवाची सांगता या अभियानाने होणार आहे.'Meri Mati Mera Desh' activity will be implemented from August 9 to August 14 ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येणार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ देशाच्या कानाकोपऱ्यातून शहीद वीरांच्या गाथांना या माध्यमातून उजाळा देणारा मिट्टी को नमन – वीरों को वंदन उपक्रमात गावोगावी त्यात्या गावातल्या किंवा शहरातल्या हुतात्म्यांची नावं शिलाफलकावर कोरण्यात येणार आहेत. हे काम मनरेगा मार्फत करण्याच्या सूचना आहेत. वसुंधरा वंदन कार्यक्रमाअंतर्गत देशी वाणाच्या ७५ झाडांची लागवड सार्वजनिक ठिकाणी करण्यात येईल. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या ५ संकल्पांशी प्रतिबद्ध राहण्याची पंचप्रण शपथ सामूहिक रीतीने हातात मातीचे दिवे धरुन घेण्यात येईल. गावोगावची माती संग्रहित केलेले अमृत कलश एकत्र करुन साडेसात हजार अमृत कलशांची यात्रा उद्या देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी दिल्लीसाठी रवाना होईल.

नवी दिल्लीतल्या युद्धस्मारकापाशी ही माती विसर्जित करण्यात येईल आणि त्यातून अमृत वाटिका उद्यान फुलवण्यात येईल. आपापल्या गावातल्या मातीला वंदन करुन ही माती हातात घेतलेली सेल्फी अभियानाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी मन की बात मधून केलं होतं. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येईल.तालुका स्तरावर माती गोळा करण्याचा उपक्रम १६ ते २० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. अभियानासाठी प्रशासन सज्ज असून सांस्कृतिक कार्य सचिवांनी जिल्हा पातळीवरच्या तयारीचा आढावा घेतला आहे.राज्यातला मुख्य कार्यक्रम उद्या सकाळी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत यावेळी ‘शिलाफलका’ चं अनावरण आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन’ या उपक्रमांतर्गत शहीद आणि वीरांचा नामोल्लेख असणारा शिलाफलक बसवला जाणार आहे. उद्या नेरूळ इथल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या उद्यान परिसरात मातीचे दिवे किंवा माती हातात घेऊन उद्या सकाळी पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे.

नागपूर मध्ये या अभियानांतर्गत शिलाफलकाचं समर्पण, पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरांना नमन, ध्वजारोहण आणि राष्ट्रगान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या १३ तालुक्यातून अमृत कलशसाठी मातीचा संग्रह केला जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितलं. ‘वीरो का वंदन’ या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी द्वारे स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरं करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या अभियांनातर्गत बोध चिन्ह, प्रधानमंत्री यांचा व्हिजन २०४७ चा संदेश, आणि स्थानिक शहीद वीरांची नाव असणारा फलक लावला जाणार आहे.

कोल्हापूर मध्येही या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार असून, त्यात शिलाफलक, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन या कार्यक्रमांसह प्रत्येक घरी आणि कार्यालयात तिरंगा फडकवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वार्ताहर परिषद घेऊन जिल्हावासियांना अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं.

अभियानात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in/ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर शपथ घेतांना मातीचा दिवा किंवा माती हाती धरून काढलेले सेल्फी अपलोड करता येतील.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
लोकसहभागातून ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम उत्साहात राबविणार
Spread the love

One Comment on “देशभरात उद्यापासून सर्वत्र ‘मेरी माटी मेरा देश’अभियान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *