जलशक्ती मंत्रालयाकडून मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर

Ministry of Jal Shakti announces Internship Programme for Mass Communication students जलशक्ती मंत्रालयाकडून मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Ministry of Jal Shakti announces Internship Programme for Mass Communication students

जलशक्ती मंत्रालयाकडून मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर

इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 10,000/- रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्रMinistry of Jal Shakti announces Internship Programme for Mass Communication students
जलशक्ती मंत्रालयाकडून मास कम्युनिकेशन  अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम आहे.

जे विद्यार्थी, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए/एमए अभ्यासक्रमांमध्ये किंवा एमबीए (मार्केटिंग) {मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेत पदवी घेतली आहे} चे शिक्षण घेत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून उपरोक्त अभ्यासक्रमांमध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे ते मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद अटींच्या अधीन पात्र आहेत.

इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा असेल. निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 10,000/- रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणारे फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि इतर तपशील पुढील लिंकवर पाहू शकतात:   https://jalshakti-dowr.gov.in/document/notice-for-internship-of- mass-communication-last-date-15-sep-2023/

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करणार
Spread the love

One Comment on “जलशक्ती मंत्रालयाकडून मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *