Students of Sadhana Vidyalaya took Panch Pran Oath
साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंच प्रण शपथ
“माझी माती माझा देश “या अभियानांतर्गत दि.9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
हडपसर : भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा समारोप 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.या समारोपाच्या निमित्ताने देशात “मेरी मिट्टी मेरा देश ” अर्थात “माझी माती माझा देश “या अभियानांतर्गत दि.9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,विभागप्रमुख विजय सोनवणे,धनाजी सावंत व पांडुरंग गाडेकर यांनी केले.
या अभियानांतर्गत साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनिअर काॅलेमध्ये दि.12 ऑगस्ट 2023 रोजी विद्यार्थ्यांना पंच प्रण शपथ देण्यात आली. भारताचा विकास,देशप्रेम,क्रांतिकारकांचा आदर करणे,गुलामगिरीची मानसिकता बदलणे,देशासाठी अमूल्य वेळ देणे व स्वातंत्र्यलढ्यातील देशभक्तांचा सदैव आदर करणे असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. विद्यालयातील शिक्षक प्रतापराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
दि.13 ऑगस्ट रोजी “हर घर झंडा ,घर घर झंडा “या उपक्रमांतर्गत विद्यालयात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अरविंद भाऊ तुपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिनांक.14 ऑगस्ट रोजी देशासाठी कार्य करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले. संचलन पुणे जिल्हा R.S.P. समादेशक रमेश महाडीक यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंच प्रण शपथ”