Online applications are invited for the ‘National Gopal Ratna Award-2023’ by September 15
‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
वर्ष 2023 या वर्षासाठी विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कारांची घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रदान केला जाणारा राष्ट्रीय ‘गोपाल रत्न पुरस्कार’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नॅशनल अवॉर्ड पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.
दूध उत्पादक शेतकरी, दूग्ध सहकारी संस्था, दूध निर्मिती कंपनी (एमपीसी), दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कार केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने प्रदान केला जातो. यासाठी इच्छुकांनी https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.
शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध व्हावी, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त असून त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर 2014 मध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ अभियान’ (आरजीएम) सुरु करण्यात आले. या अंतर्गत देशी गायी- म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जाते.
वर्ष 2023 या वर्षासाठी विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे), सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध निर्मिती कंपनी (एमपीसी)/दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना (एफपीओ), सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) अशी श्रेणी केली आहे.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 प्राप्त पहिल्या दोन विभागांसाठी म्हणजेच सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/ एफपीओ/ एमपीसी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाईल. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.5,00,000/- (पाच लाख रुपये) तर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) पारितोषिक दिले जाईल.
सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) विभागासाठी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या पुरस्कारामध्ये केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश असेल. राष्ट्रीय दुग्ध दिवसाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2023 रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी https://awards.gov.in किंवा https://dahd.nic.in संकेतस्थळांना भेट द्यावी.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com