Tribute to senior writer, researcher, progressive thinker late Prof. Hari Narke..
ज्येष्ठ लेखक, संशोधक,पुरोगामी विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांना कर्मभूमी हडपसर मध्ये श्रद्धांजली..
हडपसर : दिवंगत प्रा. हरी नरके यांचे ९ऑगस्ट रोजी निधन झाले.त्यांच्या कर्मभूमी हडपसर मध्ये शोकसभेचे आयोजन सर्व संघटनांच्या वतीने कन्यादान मंगल कार्यालयात सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते. वेळी श्रद्धांजली वाहताना प्रा.सुभाष वारे म्हणाले की मनुवादी विचारसरणीच्या विरोधात आपल्या लेखणीतून कृतिशील विचार मांडणाऱ्या हरी नरके यांच्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे.
पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की नरके यांच्या निधनानंतर ज्या विक्षिप्त , जाणीवपूर्वक समाजात विष पेरणाऱ्या प्रतिक्रियांचा सामना तितक्याच ताकतीने करावा लागणार आहे.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले नरके यांनी लिहिलेले महात्मा फुले समग्र वाड्यमय घरोघरी पोहोचविले पाहिजे. माजी आमदार योगेश टिळेकर म्हणाले ओबीसी चळवळीचा आधारवड गेल्यामुळे कधीही भरून येणारे नुकसान झाले.
माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की नरके यांनी महात्मा फुले समग्र वाड्यमय साठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. निलेश मगर म्हणाले की हरी नरके यांचे स्मारक हडपसर मध्ये उभे करणे अत्यंत आवश्यक असून ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
विद्यमान आमदार चेतन तुपे म्हणाले की मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ह्यासाठी नरके यांनी आयुष्य भर संघर्ष केला. यावेळी के. टि आरु ,जीवन जाधव,मृणाल ढोले पाटील,वैष्णवी सातव,मनीषा राऊत,संगीता बोराटे,यांनीही श्रद्धांजली सभेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र बनकर,सूत्र संचालन अनिल व्हावळ तर आभार प्रदर्शन मुकेश वाडकर यांनी केले. या वेळी मा.नगरसेवक योगेश ससाणे,सुनील बनकर,संतोष शिंदे,तान्हाजी ससाणे, शिवराम जांभूळकर, सविता हिंगणे,प्रमोद सातव , नितीन आरू,बाळासाहेब हिंगने, सचिन आल्हाट,अजित ससाणे, मंगेश ससाणे, पोपट वाडकर, मच्छिंद्र वाडकर , नितीन होले प्रशांत सुरसे जीवन जाधव,हडपसर पाथरी पंचायत चे मोहन चिंचकर, धनगर समाज उन्नती मंडळाचे अनिल धायगुडे, जन गर्जना मंचचे विठ्ठल सातव, सिद्धार्थ बुद्ध विहाराचे सचिन आल्हाट, रुपेश अल्हाट, सतीश आल्हाट, मनीषा अल्हाट, समता परिषदेचे पंढरीनाथ बनकर, माळी महासंघाचे पांडुरंग माटे, महात्मा फुले समितीचे गणेश फुलारे,निलेश ससाने चंद्रकांत ताजने, बाळू ससाने बाबा गोंधळे, महेश टेळे,विवेक तुपे ,भागुजी शिखरे, राजेंद्र ढवळे, सोनावणे तात्या,तोडकर विशाल बोरावके,संगीता बोराटे,दिपाली माटे,वैष्णवी सातव, गणेश वाडकर, मंगेश नरके , उज्ज्वला टिळेकर, सुनीता भगत,मनीषा राऊत ,वृषाली वाडकर, ईश्वर नरके, सुदाम नरके,तुषार हिंगणे, आदी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com