Various programs were conducted under the campaign ‘Meri Mati, Mera Desh
माझी माती, माझा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य महोत्सवाबद्दल ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दि. ९/८/२०२३ पासून सुरु झालेला आहे. सदर सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात “मेरी माटी मेरा देश हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १३ ज्ञानदा प्रतिष्ठान संचलित शाळा विद्यार्थी यांच्या संयुक्त रॅली चे आयोजन करण्यात आले आजादी का अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश ( माझी माती माझा देश ) स्वातंत्र्य सैनिक व वीर जवान प्रति कृतार्थ भावना व्यक्त करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये एकत्मता दृढ करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ओला सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा कापडी पिशवीचा वापर करा, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ पुणे सुंदर पुणे, हरित पुणे या बाबत संदेश नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रसंगी मा. महापालिका सहायक आयुक्त राजेश गुरम , श्री मंदार शेंडे -सचिव, श्रीमती.स्वाती कुलकर्णी श्री जगदीश वाघ ,उप अभियंता दळवी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड, शाळेतील विद्यार्थी व विध्यार्थीनी आणि मनपा सेवक उपस्थित होते.
शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाचे मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री.रवि खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली , आरोग्य निरीक्षक श्री.नलावडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी श्री. वालुबाई शेलार यांचे नातेवाईक श्री. दत्तात्र्य शेलार यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी क्षेत्रिय कार्यालयातील इतर सेवक व नागरिक उपस्थित होते. ७६ वीर सुपुत्रांचा सन्मान केला गेला. शाखा अभियंता श्री.सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, कनिष्ठ अभियंता श्री. अभिजीत टेंभुर्णे यांच्या हस्ते श्री.स्वप्नील टेंभुर्णे यांच्याशी भेट घेऊन मातीचे संकलन करण्यात आले व पंच प्रण शपथ घेण्यात आली. पंचप्राण शपथ व स्थानिक व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीलिमा काकडे (आरोग्य निरीक्षक) यांच्या हस्ते सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता श्री.मोहन आगाशे यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक श्री.मांडेकर व इतर सेवक उपस्थित होते.
धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला. यामध्ये सेवानिवृत्त सैनिक वीर पत्नी जेष्ठ नागरिक त्याचबरोबर राजगुरू यांचे नातू यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, पोलीस दलातील जवान, विरपत्नी तसेच मा. सत्यशील राजगुरूजी यांचा यथोचित सन्मान,करण्यात आला व वीरांना वंदन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माजी सैनिक वीर पत्नींचा सन्मान प्रसंगी सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे , पोलीस निरीक्षक विजय कुंभार, राजेश कादबाने आणि इतर उपस्थित होते.
कसबा विश्रामबागवाडा क्षेञिय कार्यालय, अंर्तगत आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुशंगाने स्वातंञ सैनिक यांचे सत्कार करण्यात आले. मातीचे संकलन करण्यात आले व पंचप्रण शपथ घेण्यात आली. पंचप्राण शपथ व स्थानिक व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री. बाळासाहेब ढवळे पाटील,महापालिका सहाय्यक आयुक्त ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता श्री.अशोक झुळूक, प्र. उप अभियंता श्री. बाळासाहेब पंडित, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनिल तंवर, आरोग्य निरिक्षक श्रीमती. लक्ष्मी गवारी, ब्रँड अँबेसिडर श्री राजेश गायकवाड, मोहल्ला कमिटी सभासद व इतर अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “माझी माती, माझा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न”