92 students achieved success under Mahajyoti’s exam coaching scheme
महाज्योतीच्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत ९२ विद्यार्थ्यांना घवघवीत यश
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सक्सेस पुणे या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणातील ९२ विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची माहिती महाज्योती संस्थेने दिली आहे.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लक्षीत विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने महाज्योती, नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सक्सेस पुणे या संस्थेमार्फत युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते.
महाज्योतीकडून इच्छुक नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी एकूण १ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या १ हजार २०७ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आवश्यक व आकस्मिक गरजेकरीता सहा महिने विद्यावेतन देण्यात आले. मोफत प्रशिक्षणात निवडण्यात आलेल्या विषयाचे वर्ग, विषयवार चर्चा, प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.
महाज्योती, नागपूर यांच्यावतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या युजीसी नेट, सीएसआयआर नेट व एमएच सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
सैनिकी मुलां, मुलींचे वसतिगृह पुणे येथे कंत्राटी पद्धतीने अशासकीय पदभरती
One Comment on “महाज्योतीच्या परीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत ९२ विद्यार्थ्यांना घवघवीत यश”