Changes in parking arrangement under Deccan Transport Division
डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल
पुणे : डेक्कन वाहतुक विभागांतर्गत कर्वे रोडवरील पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
त्यानुसार रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना बँक ऑफ महाराष्ट्रसमोर १० मीटर, भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्य नगरी सोसायटी १५ मीटर, युनियन बँक ते स्वप्न नगरी सोसायटी २० मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर सिद्धेश्वर मेडीकल ते कोहिनूर वॉईन्सपर्यंत १५ मीटर आणि गणेश चेंबर, रेबन शोरुम ते अमर हार्डवेअर पर्यंत १५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौकाकडे जाताना कल्याण ज्वेलर्सशेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो- कलर्स दुकानपर्यंत ५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाऊस, सारथी हॉटेल ते प्राईम फर्निचर शोरुम पर्यंत २५ मीटर दुचाकी व २५ मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे. भोडे कॉलनी लेन ते कचरे पथ १० मीटर दुचाकी व १० मीटर चारचाकी पार्किंग करण्यात आले आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
महाज्योतीच्या परीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत ९२ विद्यार्थ्यांना घवघवीत यश
One Comment on “डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल”